महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले असून. प्रदर्शनाचे उद्घाटन आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे आणि विश्वस्त अनुपमा बर्वे ,श्रीनाथ कवडे ,सुमन किलोस्कर , प्रशांत काळे , प्रशांत चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते . ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.. या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.
पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.
यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे. संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.
बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील, एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…