Categories: Uncategorized

आरक्षण वाचवण्या करिता विणकर समाजाचे , ‘चलो पुणे’ ! … पुणे येथे १४ मे रोजी महाराष्ट्रातील विणकर समाजाची एल्गार सभा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे) : गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील विणकर 2% स्वतंत्र आरक्षण मिळण्या करीता लढत आहेत, या समाजाला राजकीय सोडून सरकारी नोकरी आणि इंजिनिअरिंग शिक्षण मध्येच 2% आरक्षण होते, केंद्र सरकारच्या निर्णयातून 50 टक्के वरील आरक्षण रद्द होत असल्याने, या विणकर समाजाला 2% स्वतंत्र आरक्षण देण्याकरीता आता पुन्हा झगडावे लागणार आहे, हे आरक्षण वाचवण्या करिता पुणे येथे विणकर समाज कृती समितीच्या वतीने ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली आहे.

या एल्गार सभेमध्ये विणकर समाजातील सर्व जाती एकत्र येण्याचे आवाहन समाजातील आयोजकांनी केले आहे. विणकर समाजाला स्वातंत्र्य दोन टक्के आरक्षण आहे आणि स्वातंत्र विणकर महामंडळ असावे, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण मध्ये देखील आरक्षण असावे याकरिता ‘अभी नही तो कभी नही’ अशा संघर्ष करणारी घोषणा सर्व विणकर बांधवानी एकत्र येऊन केली आहे, सद्या आहे ते आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर असल्याने सरकारला जागे करण्याकरता कोणत्याही लढ्याची तयारी समाज करीत आहे.

आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे, यामुळे आता पुणे येथे 14 मे रोजी विणकर समाजाची आरक्षण पदाधिकारी बैठक सभा रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री चौडेश्वरी मंदीर, देवांग हॉस्टेल,  म.न.पा. शाळेच्या मागे, पिंपळे निलख, पुणे ४११०२० याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. याकरता आपण सर्व विणकर बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमचे संयोजक सुरेश दादा तावरे यांनी केले आहे . सुरेश तावरे याच बरोबर समस्त कोष्ठी समाजाचे अध्यक्ष अरुण वरुडे यांनी देखील आव्हान केले आहे ह्या बैठकीला संपूर्ण राज्यातून विविध पदाधिकारी येण्याची अपेक्षा आहे त्याकरता विणकर समाजातील प्रत्येक जाती पोट जातीने यामध्ये सहभाग नोंदवून सरकारला जागे करण्याची गरज आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

4 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

5 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

2 weeks ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago