Categories: Uncategorized

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निरीक्षक एम. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ फेब्रुवारी २०२३) : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निरीक्षक एम. सत्यनारायण, निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमवेत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय, थेरगांव येथे बैठक पार पडली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या बैठकीत निवडणूक विषयक पुढील प्रक्रिया आणि उमेदवारांनी करावयाच्या आवश्यक बाबींची माहिती दिली. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उमेदवाराने ठेवायच्या दैनंदिन खर्चाच्या पद्धती, स्ट्रॉग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, आदी विविध विषयांची सचिन ढोले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ईव्हीएम यंत्र स्थलांतरीत करताना तेथे उमेदवारांना उपस्थित राहता येईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन ही संवेदनशील बाब असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्यादृष्टीने तंतोतंत पालन केले जाईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची सर्व प्रक्रिया उमेदवारांना पूर्व सूचना देवूनच केली जाईल. मतदान यंत्राची सरमिसळ करताना उमेदवारांना उपस्थित राहता येईल. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यास आम्ही कटिबद्ध असून सर्व प्रक्रिया सूत्रबद्ध पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखत पार पाडण्यात येईल. उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खर्चाची मर्यादा आणि त्याचे दरपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले असून त्याप्रमाणे उमेदवाराने स्वतंत्र प्रतिनिधी नेमून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करावा. कोणतीही अडचण आल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन ढोले यांनी यावेळी केले. उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेली माहितीदेखील यावेळी देण्यात आली..

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

4 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

5 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

2 weeks ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago