Categories: Uncategorized

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या इसमाचा थरारक बचाव.. अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी रात्री अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर एका इसमाने चढून धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याची घटना घडली. रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण उप अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान संबंधित इसम टॉवरच्या शिखरावर उभा राहून तारेवर कसरत करत असल्याचे दिसून आले,त्यामुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता.

उप आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तातडीने ५५ मीटर उंचीची ब्रांटो स्काय लिफ्ट मागवून बचावकार्य सुरू केले. रेस्क्यूदरम्यान संबंधित इसमाने टॉवरवरील अर्थिंग वायरचा जॉइंट खाली फेकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडस आणि कौशल्य दाखवत बचावकार्य केले. प्रारंभी चालक आणि यंत्रचालक दीपक ढवळे यांनी टॉवरखाली जंपिंग शीट व ताडपत्री लावून आवश्यक सुरक्षेची उपाययोजना केली. त्यानंतर लिडिंग फायरमन विकास नाईक यांनी टॉवरवर चढून इसमाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर फायरमन सचिन ठोसरे यांनी त्यांना सहकार्य केले.

यानंतर सह अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि अनिल माने यांनीही टॉवरवर चढून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. दुसऱ्या बाजूने ब्रांटो स्काय लिफ्टच्या सहाय्याने ऋषिकांत चिपाडे, अमोल चिपळूणकर आणि नाथा शिंदे यांनी बचावकार्य सुरू ठेवले. ब्रांटो ऑपरेशन अमोल चिपळूणकर आणि रुपेश जाधव यांनी यशस्वीरीत्या हाताळले.

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित इसमाला सुरक्षितपणे पकडून ब्रांटो केजमध्ये घेतले आणि सुखरूप खाली आणले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या बचावकार्यात अग्निशमन दलासोबत पोलीस, महावितरण अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.
——–

नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. हाय टेन्शन वीजवाहिन्या, टॉवर्स किंवा इतर धोकादायक ठिकाणी जाणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक बाब आढळल्यास तात्काळ महानगरपालिका किंवा पोलिस प्रशासनाला कळवावे.
– *डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*
—-

अशा प्रकारच्या घटनांमध्ये बचावकार्य करताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहते. नागरिकांनी अशा धोकादायक कृती टाळून प्रशासनाला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः हाय टेन्शन टॉवर्स, उंच इमारती किंवा प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ माहिती दिल्यास जलद आणि प्रभावी मदत पोहोचवणे शक्य होते.
– व्यंकटेश दुर्वास, उप आयुक्त, अग्निशमन विभाग , पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
——–

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago