Categories: Uncategorized

अजितदादांचा रेकॉर्ड मोडत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.04 मे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. सुनेत्रा पवारांनी दिवंगत अजित पवारांचे रेकॉर्ड देखील मोडीत काढत मोठे मताधिक्य मिळवलं आहे. देशात सर्वाधित मतांनी निवडून येणाऱ्या आमदार सुनेत्रा पवार झाल्या आहेत.

या सगळ्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी केलेल्या विकासकामांचे प्रतिक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहे, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित पवारांनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अशापद्धतीने निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे मला कधीच वाटले नव्हते. मन खूप भरून येत आहे. अजित पवारांनी केलेल्या विकासकामांचे प्रतिक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहे. अजित पवारांनी जनतेवर केलेले प्रेम, सेवा ही बारामतीकरांनी मतातून दाखवली आहे.”

“बारामतीकरांनी केलेल्या मतातून अजित पवारांवरचा आढळ विश्वास माझ्या पाठीशी देखील उभा केला आहे. अजित पवारांना आदरांजली वाहताना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी बारामतीकरांचे आभार मानते. माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे. अजित पवारांनी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बारामतीकरांनी एवढे मतदान दिले आहे,” असे सुनेत्रा पवारांनी म्हटलं.

“बारामतीकरांना अशाप्रकारची निवडणूक हवीच नव्हती. ही वेळ जल्लोषाची नाही. आदरांजलीची आहे. अजित पवारांना जसे शिस्त आणि संयमाची सवय होती, त्याप्रकारे कार्यकर्त्यांनी दाखवावे, अशी विनंती करते. अचानक झालेल्या आघातामुळे मी निवडणुकीला उभे राहील, असे वाटले नव्हते. बारामतीकरांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी पूर्ण करायची आहे. ही माझी सुरूवात आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंनी ज्याप्रकारचे बारामतीत काम, विश्वास आणि सेवा केली आहे. एकंदर बारामतीकरांचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. तो विश्वास आजच्या मतातून दाखवला आहे,” असेही सुनेत्रा पवारांनी सांगितलं.

सुनेत्रा पवारांना किती मते?

२ लाख, १८ हजार ९३० मते

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago