Categories: Editor Choice

दिवाळी २०२० : दिवाळीच्या सणात ‘ नरक चतुर्दशी’चे मोठे महत्त्व , जाणून घ्या मुहूर्ताची वेळ !

महाराष्ट्र 14 न्यूज : धनतेरसच्या दुसर्‍या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. त्याला ‘नरक चतुर्दशी’ असेही म्हणतात. या दिवशी अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी दिवा लावून यमराजाची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील चतुर्दशी छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी सगळ्याच सणांवर मर्यादा आल्याने दिवाळीचे महत्त्व विशेष आहे. कोरोना महामारी संकटात दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.

या दिवसाची महत्ता अशी आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. राक्षसाचा वध झाल्याने हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अंगणात सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करतात. पहाटे उठून शरीराला तेल लावतात, सुवासिक उटण्याने स्नान करतात. याला अभ्यंग स्नान असे ही म्हणतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमासाठी दीपदान करतात. गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घराच्या पुरुष मंडळींना स्नानाच्या वेळी औक्षण केले जाते. असे म्हणतात की, या दिवशी जो व्यक्ती अभ्यंग स्नान करत नाही त्याला नरकासम त्रास भोगावे लागतात. राक्षसी प्रवृतीचे प्रतिक म्हणून कारीट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. ज्याप्रमाणे भगवंताने नरकासुराचा वध केला, त्याप्रमाणे आपणही आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींना दूर करावे, अशी या मागची संकल्पना आहे.

यंदाचे शुभ मुहूर्त
चतुर्दशी तिथी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 नोव्हेंबर रोजी 2 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजून 23 मिनिट ते 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत नरक चतुर्दशीची पूजा करण्याचा शुभ काळ आहे. या 1 तास 20 मिनिटात आपण नरक चतुर्दशीची पूजा करू शकता.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

34 mins ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

12 hours ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

23 hours ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

4 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

4 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

5 days ago