संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ जानेवारी) : पिंपळे गुरव येथील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रंथ फॉर्म भरून हस्तलिखित करण्यासाठी ग्रंथाचे हस्तांतरण महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयअण्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सेंद्रिय शेतीतज्ज्ञ दिलीपराव देशमुख बारडकर, सुर्यकांत कुरुलकर , मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, प्रल्हाद झरांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, उपाध्यक्ष सुनील शिंदे, कार्याध्यक्ष पोपट चव्हाण, सचिव शिवाजी भोईर, कोषाध्यक्ष सुभाष बिनायक्या आदी मान्यवर उपस्थित होते.
आळंदीत ज्ञानेश्वरी लेखी पारायण सांगता सोहळ्यात ह. भ.प. संतोष महाराज पायगुडे आणि शेखर महाराज जांभुळकर यांनी भागवत लिखाणांचे आव्हान केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून भाविकांचा मोठा सहभाग नोंदवला जात आहे. 1008 प्रति हस्तलिखित एकनाथी भागवत लेखी करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…