Categories: Uncategorized

जागतिक शौचालय दिनानिमित्त पिंपळे गुरव येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १९ नोव्हेंबर २०२५ :* शहराच्या स्वच्छतेचा कणा म्हणजे सफाई सेवक आहेत. त्यांच्यामुळेच आपले शहर स्वच्छ, स्वास्थ्यदायी आणि सुंदर राहत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.

जागतिक शौचालय दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातर्फे पिंपळे गुरव येथील लिनिअर गार्डनमध्ये ‘सफाई सेवकांशी संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. ठेंगल बोलत होते. “ड” क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, प्रणय चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई सेवक यावेळी उपस्थित होते.

शहराच्या स्वच्छतेसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सफाई सेवकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सफाई सेवकांचा विशेष सत्कार डॉ. ठेंगल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सेवकांना वैयक्तिक सुरक्षेचे भान ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, शहर विकासातील सफाई सेवकांचे योगदान अनमोल आहे. सफाई सेवकांनी काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुरक्षा साधनांचा अनिवार्यपणे वापर करा. तुमचे आरोग्य सुरक्षित राहणे म्हणजेच शहराच्या स्वच्छतेची खरी ताकद आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. ठेंगल म्हणाले, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून ‘स्वच्छ पिंपरी चिंचवड – सुंदर पिंपरी चिंचवड’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण चांगल्या अवस्थेतील वस्तू पालिकेच्या आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात. जेणेकरून गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे सांगतानाच डॉ. ठेंगल यांनी सार्वजनिक शौचालये नेहमी स्वच्छ ठेवणे, त्यांचा नियमित वापर करणे, तसेच सोसायटी, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे याबाबतही मार्गदर्शन केले. आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृती यांसंदर्भात आगामी काळात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
……

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago