यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नावनोंदणी करण्यात येणार असून उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधार नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड वितरण, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, जाती प्रमाणपत्र आदींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहेत. योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
पिंपरी चिचंवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तसेच पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणासाठीच्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने मानसिक आरोग्य, संसर्गजन्य आजार कार्यक्रम, व्यसनमुक्ती समुपदेशन, मोतीबिंदू निदान, नेत्र तपासणीबाबतचे स्टॉल लावण्यात येणार असून योग शिबीरही आयोजित करण्यात येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात येणार आहे.
दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आदी महामंडळांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना, अनुदान योजनांसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेणे, प्रस्ताव तयार करण्यासाठी दिव्यांग बांधवांना मदत करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…