Categories: Uncategorized

दिल्ली हादरली, लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ नोव्हेंबर :- प्रचंड गर्दीचे ठिकाण असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमनच्या सात गाड्या आग विझवत आहेत. दरम्यान, एवढा मोठा स्फोट झाल्यामुळे यामागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर NIA आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळीची पाहणी करत आहे.

मेट्रो स्टेशनच्या गेट नं. 1 जवळ कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे बाजूच्या तीन गाड्यांनाही आग लागली. ही घटना सायंकाळी 6.52 मिनिटांनी घडली आणि लगेचच अग्निशमन दलाला फोन आले. त्यानंतर तातडीने अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाला. पुरानी दिल्ली अशी ओळख असलेल्या लाल किल्लापासून अर्धा किलोमीटवर मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये हा स्फोट झाला. या दुर्घटनेत 8 ते 10 गाड्या जळाल्या आहेत.

दिल्लीतील स्फोटानंतर दिल्लीसह मुंबई हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. इको कारमध्ये हा स्फोट झाला. त्यानंतर आजूबाजूच्या 8 ते 10 गाड्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत खाक झाल्या आहेत. सर्व गाड्यांचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत.

या स्फोटामुळे परिसरात कानठल्या बसवणार आवाज झाला. यात सध्या 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. मात्र, स्फोटाची क्षमता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

5 days ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

5 days ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*…

1 month ago