Google Ad
Uncategorized

पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या स्वर-बहार गायनाने कासारवाडीतील दत्त जयंती सप्ताहाची सांगता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ डिसेंबर) : कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रमामध्ये दिनांक १२ डिसेंबर ते दिनांक १९ डिसेंबर या कालावधीमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज ( दि.१९ डिसेंबर) रविवारी सकाळी १० वाजता ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे यांनी काल्याचे किर्तन केले. आपल्या कीर्तनातून त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला सांगितल्या.

कासारवाडी व पिंपळे गुरव परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते. या सप्ताहामध्ये नियोजित संत तुकाराम महाराज मंदिर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर यासाठी विविध भाविकांकडून निधी जमा करण्यात आला. सर्व निधी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संध्याकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध गायक पं. कल्याणजी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला.

Google Ad

या सप्ताह सांगता समारंभास संत तुकाराम महाराज मोरे संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संत तुकाराम महाराज संस्थान देहू चे ह. भ. प. भानुदास महाराज मोरे, शेखर दादा रबडे, बाळासाहेब मरळ, विजूशेठ जगताप, सुभाषदादा काटे, मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक सागर अंगोळकर, सुनील येडे, सुरेश भोईर, साहाय्यक आयुक्त पी बी फुगे, गणेश सोनवणे, बाळासाहेब करंजुले, श्री डुंबरे, भाऊसाहेब जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.

या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, कोरोना कळात उत्कृष्ट कार्य केलेले डॉक्टरांचा  आ. लक्ष्मणभाऊ जगताप व मित्र मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दत्त आश्रमाचे प्रमुख शिवानंद स्वामी यांनी प्रास्ताविक केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!