Google Ad
Uncategorized

‘ स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार ! … पिंपरी-चिंचवड भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शहा यांची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ पिंपरी-चिंचवडमध्ये साकारात आहे. या शंभूसृष्टीचे अनावरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुमती दिली आहे. तसेच, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याबाबत केलेल्या न्यायालयीन लढ्यात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचेही अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी (सीएफएसएल) येथे पिंपरी-चिंचवड भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ ची प्रतिकृती यावेळी अमित शहा यांना भेट देण्यात आली. त्यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच, देशातील तमाम शिव-शंभू प्रेमींसाठी प्रेरणास्थान असलेल्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी आपण उपस्थित रहावे, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांनी केली. यावर आपण आवर्जुन उपस्थित राहू, अशी अनुमती शहा यांनी दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!