महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : संघटनेत काम करताना ‘एकमेकां सहाय्य करू’ हे धोरण प्रत्येकाने अंगीकारताना आपले १०० टक्के योगदान देणे गरजेचे आहे. कार्यकारिणी आणि कार्यकर्ता हे आपल्या संघटनेची दोन चाके आहेत. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपले ‘उद्दिष्ट’ साध्य करता येवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत जगातील बलशाली राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारीणीचा पदवाटप कार्यक्रम मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात बुधवारी झाला. यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, शैला मोळक, अजय पाताडे, संजय मंगोडीकर, नामदेव ढाके, मावळ विधानसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार हिंगे, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, संदीप नखाते, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, पक्षाची धोरणे, मूल्ये ही सर्वात आधी कार्यकारिणीमध्ये रुजविणे आवश्यक आहे. हीच मूल्ये शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी कार्यकारिणीवर असते. एकदा ही मूल्ये आणि धोरणे शेवटच्या मतदारापर्यंत पोचविली की, तो मतदार शेवटपर्यंत पक्षाशी जोडला जातो, असा मतदार जोडणे हेच सध्याच्या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगोडीकर यांनी, तर आभार अजय पाताडे यांनी मानले.
भाजपा शहर कार्यकारिणीमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे विशेष कौशल्य आहे. त्या कौशल्याचा वापर पक्ष संघटना सक्षमीकरणासाठी झाला पाहिजे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने कार्यकारिणी आणि कार्यकर्ता या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्या अनुशंगाने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…