Google Ad
Education

पिं.चिं.मनपा शाळा क्र.९३,सोनवणे वस्ती येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात … शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दिनांक १५/६/२०२२) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून उत्साही आणि आनंदी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात झाली.  क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेचा पहिला दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.  शाळांच्या इमारती लहान बालकांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजल्या. पिं.चिं.मनपा शाळा क्र.९३,सोनवणे वस्ती येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात , आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आला.

या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. उपायुक्त मा. संदीप खोत यांनी कार्यक्रमाचे उदघाटन क्रांतिज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले.या प्रसंगी मा. नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेविका साधनाताई मळेकर उपस्थित होत्या.तसेच ‘फ’ प्रभाग उपायुक्त बहुले, स्थापत्य अभियंता तापकीर ,आरोग्य विभागाचे मा. सौदाई, विद्युत विभागाचे समीर गवळी, राठोड ,आसरा सोशल फाउंडेशनच्या अर्चना मोरे मॅम,लोकमतचे पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमृत अप्पा सोनवणे, भाऊ सोनवणे उपस्थित होते. खोत यांनी आपल्या मनोगतात शाळेचे ,मुख्याध्यापक व शिक्षकांच्या उत्साहाचे व नाविन्यपूर्ण संकल्पनांचे कौतुक केले व कायम अशाच प्रकारे काम करत राहण्या साठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शाळेतील शिक्षक श्री. कारोटे व श्रीम.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठय पुस्तके वाटप केले.श्री.सोमनाथ शिंदे यांनी शैक्षणिक पोतराजाची भूमिका साकारली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ.गीर मॅडम व ज्येष्ठ शिक्षक मेचे यांनी केले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!