Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळती; २२ जणांना श्वासाचा त्रास उपचारासाठी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री अवैधरित्या गॅस भरताना नऊ सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच महानगरपालिकेच्या जलतरण तलावात मंगळवारी धक्कादायक घटना घडली.

कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरीन गॅस लिकेज झाला. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि घसा दुखीचा त्रास सुरू झाला. काही नागरिकांना तर श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जलतरण तलावात उतरलेल्या आणि जास्त त्रास होत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मनपाच्या कासारवाडी जलतरण तलावात नेहमी अनेक जण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी अनेक जण पोहण्याचा आनंद घेत होते. त्यावेळी अनेकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. तसेच खोकला येऊ लागला आणि गळ्याचा त्रास होऊ लागला.  जलतरण तलावच नाही तर या परिसरात ५०० मीटर पर्यंत लोकांना हा त्रास सुरु झाला. जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला होता. परिसरातील नागरिकांना त्रास सुरु होताच या परिसरातील रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला.

तलावातून क्लोरीन गॅस लिक झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या २० ते २२ जणांना तसेच सुरक्षारक्षकांना त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. (Pimpri News) त्यांनी संबंधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. ११ जणांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.जलतरण तलावात फिल्टर प्लँट आणि बॅलन्सिंग टाकी असते. फिल्टर प्लँट आणि क्लोरिन प्लँट जवळजवळ असतात. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिनचा वापर करतात. परंतु हे क्लोरिन किती सोडावे याचे प्रमाण ठरले असते. क्लोरिन सोडल्यानंतर तो बॅलन्सिंग टाकीतून मिसळतो. त्यानंतर हे पाणी फिल्टर प्लँटमध्ये जाते. त्यानंतर पाणी जलतरण तलावात सोडले जाते असते. या पद्धतीत पिंपरी चिंचवडमध्ये कुठे बदल झाला हे आता चौकशीनंतर समोर येणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago