Categories: Uncategorized

रहाटणी येथे आभार मेळाव्यात चिंचवडच्या आमदार ‘अश्विनी लक्ष्मण जगताप’ आणि शंकर जगताप यांनी मानले विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मार्च) : नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीनंतर भाजपच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन राहटणी येथे करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी केले. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाचे खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, पेजप्रमुख, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच ज्ञात अज्ञात सर्वांनीच या विजयासाठी परिश्रम घेतले. या सर्वांचे आभार मानण्यासाठी आज विमल गार्डन, रहाटणी येथे हा आभार मेळावा घेण्यात आला.

रहाटणी येथे झालेल्या आभार मेळाव्यात चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार ‘अश्विनी लक्ष्मण जगताप‘ यांनी  विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. या मेळाव्यामध्ये भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप यांनीही सर्वांचे आभार मानले, त्यावेळी ते म्हणाले “जनतेने भाजपवर दाखविलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जावू देणार नाही, जनतेने दाखविलेला विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच ऋणी राहू, मात्र जनतेचे आभार मानणे हे देखील आमचे कर्तव्य आहे”. तसेच आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार व भाजपा शहराध्यक्ष मा.महेशदादा लांडगे, आमदार सौ. उमाताई खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, सचिन साठे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

6 hours ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago