Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ डिसेंबर) : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सत्कार करण्यात आला यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

महानगरपालिकेतील वाहनचालक बालाजी अय्यंगार यांचा २३ वर्षीय मुलगा प्रणव अय्यंगार यांची नुकतीच भारतीय नौदल सेनेत सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली. तमिळनाडू येथे जन्मलेल्या सब लेफ्टनंट प्रणव अय्यंगार यांची आधीपासूनच सैन्यदलात काम करण्याची इच्छा होती. त्यांचे वडील नेहमी त्यांना स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी युद्ध स्मारकावर घेऊन जायचे त्यामुळे तेथील रुबाबदार गणवेशातील पदक धारण केलेले अधिकारी पाहून प्रणव यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा झाली. यासाठी त्यांनी १० वी नंतर एनडीएची परीक्षा दिली पण त्यांना या परिक्षेत यश आले नाही, पण त्यांनी हार मानली नाही आणि इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर पुन्हा २०२१ साली संयुक्त सेवा सुरक्षा परीक्षा पास केली. परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रणव यांनी एझिम, केरळ येथील इंडियन नेव्हल अकादमी येथे दीड वर्षे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर एकुण गुणवत्तेमध्ये त्यांना श्रीलंका नौसेनेचे व्हाईस ऍडमिरल प्रियंथा परेरा यांच्या हस्ते रौप्य पदक देण्यात आले. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२३ रोजी नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्या उपस्थितीत प्रणव अय्यंगार यांना सब लेफ्टनंट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रणव यांनी नौदल प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली.

तर मुख्य लेक्षा परिक्षण विभागातील आत्माराम माने यांचा मुलगा अभिषेक माने यांनी दक्षिण अमेरिकेतील इलो, पेरू येथे झालेल्या मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स २०२३ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विविध देशातील १५ स्पर्धकांमधून द्वितीय उपविजेतेपद मिळवून जागतिक मंचावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावले. यासोबतच त्यांनी मिस्टर प्लॅनेट कॉपर वर्ल्ड हा खिताबही जिंकला. याआधी  मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स २०२३ उपांत्य फेरीदरम्यान मिस्टर प्लॅनेट एशिया २०२३ चे विजेतेपदही त्यांनी पटकावले होते.

मुख्य लेखा परिक्षण विभागातील उपलेखापाल दिप्ती हांडे यांचा मुलगा यशराज हांडे याने १७ वर्षीय जिल्हास्तरीय ओपन साईट एयर रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधताना यशराजने लहानपणापासूनच नेमबाजीचे आवड असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय नेमबाज होण्याची इच्छा व्यक्त केली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago