Categories: Editor Choice

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांच्याच सदस्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : चिंचवड मतदार पोटनिवडणुकीबाबत आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपचे राज्य सरचिटणीस व पोटनिवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ, रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह भाजपचे व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांच्याच सदस्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीकरीता उमेदवार कोण असावा, याचा निर्णय आमची भाजपची कोअर कमिठी करीत असते. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. तुमच्या प्रश्नांमध्ये पिंपरी चिंचवड नागरिकांचं आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं उत्तर आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबातीलच सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत कुणाचं दुमत नसणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

आजची जी बैठक पार पडली, या बैठकीत उमेदवाराबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपच्या कोअर कमिठीला आहे. ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र या निवडणुकीबाबत आम्ही गाफील राहणार नाहीत. त्यामुळे याची तयारी आम्ही सुरू केली आहे. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असले तरी त्या सर्वांशी शहराध्यक्ष महेश लांडगे हे संवाद साधतील. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर लोकांचे प्रेम आहे. त्यामुळे इच्छुकांचा विषय फार कठीण नाही. तसेच महाविकास आघाडीतील सर्व प्रमुखांशी संवाद साधून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार असल्याचे पालकमंत्री व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी… कोण होणार, चिंचवडचा आमदार ?

  महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…

1 day ago

मतदारांना आवाहन – मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल आणण्यास मनाई

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…

6 days ago

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन …. अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…

1 week ago

गावच्या स्मार्ट विकासासाठी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर चिंचवडवासीयांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…

1 week ago

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…

1 week ago