Categories: Uncategorized

पिंपळे गुरव मध्ये नागरिकांमध्ये आनंदोत्सव … श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या कलशाचे पिंपळे गुरव मध्ये जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ डिसेंबर) : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात २२ जानेवारी २०२४ ला भव्यदिव्य सोहळ्यात होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जय्यत तयारी सुरू केली आहे.अयोध्येतून अक्षतांचे कलश पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले.

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियानासाठी
श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या कलशाचे पिंपळे गुरव येथील श्री तुळजा भवानी मंदिरात आगमन झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप  आणि परिसरातील नागरिकांकडून कलशाचे पूजन करून श्री हनुमान मंदिर व पुढे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे रामभक्तांच्या पूजनासाठी कलश ठेवण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कलशाचे पूजन करून महाआरती करण्यात आली.

पिंपळे गुरवचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिरामध्ये सुरु असलेल्या भैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन सोहळ्यात देखील सहभागी होताना प्रसिद्ध कीर्तनकार हभप सागर महाराज बोराटे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद घेतला. यावेळी पवित्र कलशाचे पूजन कीर्तनासाठी आलेल्या भाविकांनी देखील केले. यावेळी सर्वच वातावरण भक्तीमय झाले होते.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख धनंजय वांजरे, माजी नगरसेवक श्री. सागर अंगोळकर, माजी नगरसेविका सौ.उषाताई मुंढे, माजी स्वीकृत सदस्य श्री. महेश जगताप, समस्त गावकरी भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री. जयराम देवकर, कीर्तनकार हभप स्वप्नील महाराज कदम, सांगवी गट संघचालक लक्ष्मणबापू पवार, जिल्हा संपर्क मंडळाचे श्री. मनोज ठाकूर, सांगवी गट कार्यवाह श्री. सोपानराव कुलकर्णी, पिंपळे गुरव नगर कार्यवाह श्री. शैलेश देशपांडे, श्री. मोहित गंधर्व, श्री. योगेश थोरात, सौ. शीतल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेश जगताप, श्री. रमेश काशीद, श्री.शशिकांत दुधारे, श्री.शिवाजी कदम, श्री. आदेश नवले, श्री. जीवन जाधव , व समस्त चावडी ग्रुप पिंपळे गुरव यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळे गुरव परिसरातील सर्व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

1 day ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 months ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago