महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला जनतेने अभुतपूर्व असा कौल दिला आहे. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेचे वेध लागले असून, रविवारी उशीरा महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत.
राजधानीत होणार मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब
रविवारी महायुतीच्या नेत्यांची आणि भाजपच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक पार पडली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. हा शपथविधी आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर किंवा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदाव देवेंद्र फडणवीस असले तरी, भाजप पुन्हा एकदा धक्का देतो की, फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करतो, ते अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
दिल्लीमध्ये भाजप हायकमांडसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
महायुतीच्या फॉर्म्युलानुसार राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता आहे. याचवेळी महायुतीच्या पक्षांमध्ये प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार भाजपचे 22-24, शिंदे गटाचे 10-12 आणि अजित गटाचे 8-10 आमदार मंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज सोमवारी मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा होऊ शकतो. महायुती राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अर्थात आरएसएसची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला प्रमुख पसंदी आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…