महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑगस्ट) : भाजपा आता मोठा झालाय, दाही दिशांना विस्तारलाय. भाजपाचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या दुकानात नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने काही दिसत नाही, असा जबरदस्त टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्याच भाजपला लगावला.
आज राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले आहे, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
बुलढाणा येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात काम केले. तेव्हा मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती. तेव्हा हमखास निवडणुका हारल्या जायच्या. त्यावेळी बुलढाणा जिह्यात प्रवाहाच्या विरोधात काम केले. त्यांनी कधी मान सन्मानाची अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी देशासाठी अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केले.
जेव्हा दुकान चालायला लागते तेव्हा गिऱहाईकांची कमी नसते असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, आता भाजपचे दुकान चांगले चालू आहे. गिऱहाईकांची कमी नाही आहे, पण ओरीजीनल गिऱहाईके कुठे दिसत नाहीत, असा टोला त्यांनी स्वपक्षाला लगावला. माझ्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे की आज जे चांगले दिवस आम्हाला पहायला मिळतायत ते जुन्या कार्यकर्त्यांमुळेच. त्यांची जाण ठेवा, असेही त्यांनी पुढे सुनावले.
राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात! ३० टन जीवनावश्यक…
पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…
वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…