महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०५ फेब्रुवारी) : – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रविवारी चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच मंगलमूर्ती वाड्यात जाऊन चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंचवड येथील कार्यालयात जाऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. २६ फेब्रुवारीला मतदान आणि २ मार्चला मतमोजणी आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी ‘अश्विनी जगताप’ यांना उमेदवारी दिली आहे. त्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम युतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रविवारी अश्विनी जगताप यांनी भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक, नगरसेविका यांना सोबत चिंचवड येथे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मंगलमूर्ती वाड्यात जाऊन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ महाराज देव यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी लक्ष्मणभाऊ जगताप यांचा मुलगा आदित्य जगताप, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करूणा चिंचवडे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे, महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, प्रदेश सदस्य अनुप मोरे, शेखर चिंचवडे, नवीन लायगुडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…
'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…