Google Ad
Uncategorized

पुण्यात ३ हजारांची लाच घेताना जीएसटी’ कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत … जीएसटी काढून देणारेही करतात व्यावसायिकांची फसवणूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मार्च) : वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालती रमेश कठाळे (वय ४३) असे गुन्हा दाखल केलेल्या राज्यकर अधिका-याचे नाव आहे.  याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यातआल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. अर्ज राज्यकर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता. त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले.

Google Ad

जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून कठाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

जीएसटी काढून देणारे अनेक बोगस एजेंट

पुणे शहरात जी एस टी काढून लोकांची फसवणूक करणारे अनेक खाजगी दलाल (agent) ऑनलाइन जाहिरातिची माहिती टाकून नागरिकांची फसवणूक करत आहेत, ते स्वतः आपल्या कार्यालयातुन नागरिकांची माहिती ऑनलाईन पाठवतात आणि याबाबत पूर्ण माहिती न घेता आठ दिवसांत आम्ही जी एस टी काढून देतो म्हणून नागरिकांच्या कडून हा दाखला लागतो तो दाखला लागतो या नावाखाली लुबडणूक करतात. सरकारी फी खुपच कमी असते परंतु नागरिकांना या गोष्टींची माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेत हे दलाल (agent) अधिकाऱ्यांच्या नावाखाली पैसे उकळून अक्षरशः लुबाडणूक करताना आढळतात, यावर जी एस टी विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!