Google Ad
Uncategorized

पवनेच्या तीरावर रंगली पिंपळे गुरव गावठाणातील श्री महादेव मंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवर्य ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) किर्तन सेवा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मार्च) : हर हर महादेव आणि ओम नम: शिवायच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात महाशिवरात्रीचा उत्सव शुक्रवारी मोठय़ा उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्ताने विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. तसेच काही ठिकाणी भजन, कितर्न व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 पिंपळे गुरव गावठाणातील श्री महादेव मंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. ०९ मार्च २०२४ रोजी सायं. ५ ते ७. किर्तन सेवेचे अयोजन करण्यात आले होते, यावेळी गुरुवर्य ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त पिंपळे गुरव ग्रामस्थ व शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

Google Ad

रावणाने शिवतांडाव स्तोत्र म्हटल्याचा दाखला ही महाराजांनी दिला, चंड भिल्लाची भोळी सेवा कशी होती आणि त्यांना भगवान शंकर महाराज कसे प्रसन्न झाले,  परमेश्वर काय आहे, विश्व हाच देव आहे, अशा अनेक शिवरात्रीच्या कथा सांगून गुरुवर्य ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले.

यावेळी समस्त पिंपळे गुरव ग्रामस्थ आणि शंकरभाऊ जगताप मिन्न परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यानंतर सर्व भविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!