Google Ad
Uncategorized

बिबट्याला पकडण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दीपक भाऊ मानकर व आप्पा रेणुसे मित्र परिवारातर्फे सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मार्च) : दीपक भाऊ मानकर व आप्पा रेणुसे मित्र परिवारातर्फे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून पळालेला बिबट्या पकडण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान केले व जीवावर उदार होऊन दोन दिवस काम केले त्यांचा व त्यांचे प्रमुख अधिकारी राजकुमार जाधव यांचा आज सन्मान करण्यात आला.

दोन दिवसापूर्वी सचिन नावाचा बिबट्या पिंजरा तोडून बाहेर पडला होता आणि त्याचा शोध लागत नव्हता. दक्षिण पुण्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते साहजिकच त्यामुळे लोकप्रतिनिधी वृत्तपत्र प्रतिनिधी, सोशल मीडिया यांच्याद्वारे काळजी व रोष व्यक्त केला जात होता व प्रयत्नही केले जात होते. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या या आपल्या सर्व धैर्यवान कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पुन्हा रात्रंदिवस प्रयत्न करून बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. त्यामुळे संपूर्ण दक्षिण पुण्याने सुटकेचा निश्वास टाकला. त्यामुळे यावेळी हा सन्मान यथोचित आणि त्यांची उमेद वाढवणारा ठरला.

Google Ad

कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहन देणे हे आपलं कर्तव्यच आहे या भावनेने त्यांना सन्मानित करण्यात आले. दीपकभाऊ मानकर यांच्या तर्फे प्राणी संग्रहालयाला 51 हजार रुपयाची मदतही जाहीर करण्यात आली.

ज्या काही त्रुटी प्राणीसंग्रहालयामध्ये आहेत त्या दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून योग्य तो निधी मिळून देण्याचे वचन दीपक भाऊ मानकर व आप्पा रेणूसे यांनी दिले. आपल्या छोट्या बाळ गोपाळांना या प्राणीसंग्रहालयाद्वारे उपयुक्त अशी माहिती मिळते आणि यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन मानकर यांनी दिले.

याप्रसंगी माझ्यासह प्राणी संग्रहालय प्रमुख राजकुमार जाधव ,दत्ताभाऊ सागरे, सागर भागवत ,शंकरराव कडू, सचिन कोळी सर, पांडुरंग मरगजे, दिलीप जगताप, सचिन डिंबळे, स्वप्नील जगताप, मोहन खरात, मनोज तोडकर, राजू अण्णा कोंढरे, संदीप फडके, अक्षय लीमन, सुनील सोनवणे व सत्कारार्थी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!