महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेबल फौंडेशन लोकनेते आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित “अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर” कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना प्रभू श्री राम यांच्या अयोध्यातील मंदिराची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले.
सदर शिबिर ५ जानेवारी ते ७ जानेवारी असे तीन दिवसीय आयोजित करण्यात आले असून PWD मैदान, नवी सांगावी पिंपरी-चिंचवड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोगाच्या निदानापासून निवरणापर्यंत रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे, यात 36 नामवंत हॉस्पिटल ने सहभाग घेतला असून, 855 डॉक्टर 236 स्टोल मधून रूग्णांना सेवा देत आहेत, सदर शिबीरामध्ये आज महिलांची मोफत कॅन्सर तपासणी, मोफत एक्स रे, मोफत सोनोग्राफी, सर्व रक्त तपासणी या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट तसेच व्हील चेअर चे वाटप करण्यात आले, जेष्ठ नागरिकांना कानाच्या मसीनही देण्यात आल्या, या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराला भेट देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे अवाहन आयोजक शंकर जगताप यांनी केले आहे.
या शिबिरासाठी मावळ मतदार संघाचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार श्री.महेश दादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, माजी मंत्री श्री.बाळा भेगडे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी महापौर माईताई ढोरे, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ यंपल्ले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, आरएमडी जिल्हा रुग्णालय प्रमुख वंदना जोशी, यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीरात , पहिल्याच दिवशी 70 हजार नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ घरलेतला तर जवळपास 2 लाख नागरिकांची नावनोंदणी केली. आज सकाळ पासूनच नागरिकांनी ऑफलाईन नोंदणी करताना शिबिराचा लाभ घेण्यास सुरुवात केली. आज दिवसभरात जवळपास ७० हजार नागरिकांनी या शिबिरामध्ये मोफत चिकित्सा आणि उपचार करून घेतले. यापैकी ६५० नागरिकांचे एक्सरे, १९५ सोनोग्राफी, जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांची आरोग्यचिकित्सा यांचा समावेश आहे. आज पहिल्याच दिवशी सुमारे १५०० नागरिकांनी डायलेसिससाठी नोंदणी केली असून शिबिराच्या कालावधीमध्ये सुमारे ५०० नागरिकांचे डायलेसिस करण्यात येणार आहे. १० हजार ६०० रुग्णांची नेत्र तपासणी करून, ६ हजार ४५० नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तर गरजू रुग्णांना औषधे देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…