महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये निश्चितपणे दर्जेदार उपचार मिळतात. तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांची गुणवत्ता खासगी रुग्णालयांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये कोणताही तज्ञ डॉक्टर रुग्णांना खासगी रुग्णालयांचा ‘रेफरन्स’ देणार नाही. ‘नो रेफरन्स’ बाबत धोरणात्मक निर्णय झाला असून, त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. कोणी डॉक्टर ‘रेफर’ करताना अढळ्यास त्याच्यावर कारवाई होईल. रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळाले पाहिजेत, असा राज्य सरकारचा निर्धार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘अटल महाआरोग्य विनामूल्य शिबीर’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले.
तसेच, महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ येपल्ले, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, डॉ. वंदना जोशी, डॉ. विजय वाघ, डॉ. दिपक धोत्रे, डॉ. धर्मेंद्र कुमार, उद्योजक उमेश चांदगुडे, डीपीडीसी सदस्य अप्पा रेणुसे, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, भा.वी.साचे बिपिन पाटसकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. देविदास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, प्रातिनिधीक स्वरुपात बळीराम महापूरे, दिलीप सोनकांबळे, वाजिद मंडल या दिव्यांग व्यक्तींना साहित्याची मदत करण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, महाराष्ट्रात कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्याचे कारण अशुद्ध पाणी पुरवठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठा आणि नदी संवर्धनासाठी पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक कुटुंबाना धीर देण्याचे काम झाले आहे. ही खऱ्या अर्थाने स्व. लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली ठरली आहे.
आरोग्य शिबिर लक्ष्मणभाऊंना समर्पित : आमदार अश्विनी जगताप
अपाय होण्याआधीच उपाय व्हावा… या संकल्पनेतून लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांनी अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिराची सुरूवात ९ वर्षांपूर्वी सुरू केली. कोविड काळात हजारो लोकांना आम्ही मदत केली आहे. आरोग्य शिबीर हे लोकनेते जगताप यांना आम्ही समर्पित करीत आहोत, असे आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या.
महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला मोफत उपचार : शहराध्यक्ष शंकर जगताप
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गेल्या ९ वर्षांपासून प्रत्येक वर्षी किमान दीड ते दोन लाख रुग्णांची तपासणी केली जाते. त्याचा फॉलोअप वर्षभर केला जातो. गतवर्षी १५६ लोकांची एंजिओग्राफी केली होती. त्यामध्ये ७६ जणांची एंजिओप्लास्टी मोफत करण्यात आली. दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट, चष्मे, कान-नाक-घसा तपासणी यासह बहुतेक आजारांसाठी मोफत तपासणी व उपचार दिले जातात. गतवर्षी १७ कॅन्सर रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिली. १५० हून अधिक रुग्णालये आणि सुमारे २ हजार डॉक्टर यंदा शिबिरासाठी काम करणार आहेत. यावर्षी मोफत एक्स-रे, सोनोग्राफी, रक्ताच्या सुमारे १६० चाचण्या मोफत होणार आहेत. सुमारे ५ हजार लोकांचा डायलेसिस करण्याचा नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णाला मोफत उपचार मिळणार आहे.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांनी शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेती करण्याबाबत जागृती करावी. रासायनिक खतांच्या वापरामुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहात ग्रामपंचातीचा सरपंचापासून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी प्रदूषण, जमीन प्रदूषणासाठी रोखण्यासाठी प्रशासन, सरकार आणि लोकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…