महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ फेब्रुवारी) : अश्विनी लक्ष्मण जगताप या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ९ वाजता पदयात्रेला सुरूवात होणार आहे. ही पदयात्रा ‘ग’ प्रभाग कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ग प्रभाग कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे चिंचवड विधानसभा निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.
त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि राज्यातील नेत्यांनी दोन दिवसांपासून विविध पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…