Google Ad
Uncategorized

नमिता ला न्याय मिळेपर्यत हा लढा सुरुच राहील, … न्याय देण्याची वैश्य युथ पुणे व आर्य वैश्य कोमटी समाजाची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ एप्रिल ) : कैलास चौधरी याने पत्नीचा (नमिता कैलास चौधरी) हिचा मानसिक कौटुंबिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नुकतीच घडली, हि हत्या आहे कि आत्महत्याअसा संशय पीडित तरुणीच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे, याचाच एक भाग म्हणुन दिंनाक 31/03/2024 रोजी सर्व पुणेकर समाजबांधवानातफ शोकसभेचे आयोजन ओक सभागृह शनिवारपेठ पुणे येथे करण्यात आले होते.

पुण्यातील महाराष्ट्र आर्य वैश्य समाज पुणे अध्यक्ष श्रीरामजी उपलेंचवार व श्रीपादजी नगरकर, नगरेश्वर देवालय चे उपाध्यक्ष प्रविणजी गुंडावार,कोमटी प्रिमियम लिगचे विनायक पारसेवार महा.आर्य वैश्य महासभा महीला अध्यक्षा सौ.माधवीताई कौले आर्य वैश्य युथ राज्यसंघटीका सौ मोहीनीताई मुनगिलवार आर्य वैश्य युथ पुणे शहराध्यक्ष श्रीहरीभाऊ गादेवार,संघटकप्रमुख विनायक मुनगीलवार पुणे युथ उपाध्यक्ष सुनिल जवादवार,आर्य वैश्य आथिक विकास महामंडळाचे अनिलजी डुब्बेवार तसेच मनाठकर कुटुंबीयांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याविरुध्दचा रोष व्यक्त करत आपल्या भावाना व्यक्त केल्या.

Google Ad

नमिता कैलास चौधरी आपल्या लक्ष्मीसमान पत्नीचा मानसिक कौटुंबिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले ,हि हत्या आहे कि आत्महत्या हे पोलीस तपासात सिध्द होईलचं पण दोषी कैलास चौधरी कुटुबीयाचा जाहीर निषेध करण्यात आला.भविष्यात अशी नमिता पुन्हा समाजात बळी जाता कामा नये याची दक्षता सर्वांनी घेतली पाहीजे.रेखाकाकुंनी चौधरी कुटुंबीयांच अन्यायाचा पाढाचा वाचला ,नमिताताईंनी अनेक हाल अपेष्ठा सहन करत लग्नाची 14 वर्ष संसार केला पण आरोपी कैलाशने त्यात विष पेरण्याचं काम करीत नमिताताईचा बळी घेतला.यावेळी मोठया संख्येने रेखाकाकु मनाठकर त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांचे प्रस्ताविक युथ पुणे जिल्हाध्यक्ष श्री. दिपकभाऊ भावटणकर यांनी केले.या लढयात सहभागी सर्व समाजबांधवांचे आभार मानले.यावेळी नमिताताईंला न्याय देण्यासाठी फ्लेक्स वर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सदर स्वाक्षरी मोहीम पुर्ण झाल्यावर हा फ्लेक्स मुख्यमंत्री कार्यालयात पाठवणार आहोत.

यावेळी सर्व उपस्थितांनी नमिता च्या मृत आत्म्यास भावपुर्ण श्रध्दांजली वाहली तसेच न्याय मिळेपर्यत हा लढा सुरुच राहील असे आर्य वैश्य युथ पुणे व आर्य वैश्य कोमटी समाज पुणे यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!