Google Ad
Uncategorized

उन्नती सोशल फाऊंडेश व झुंज दिव्यांग संस्थेने फुलवले ५ दिव्यांग मुलां-मुलींचे संसार : पिंपळे सौदागर येथे दिव्यांग वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, ता.२९ मार्च (प्रतिनिधी) : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील पि.के.इंटरनॅशनल स्कूल प्रांगणावर ५ दिव्यांग मुलां-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला .
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या दिमाखदार सामूहिक विवाह सोहळ्यात , कौतिकराव पंजाबराव जाधव , वर्षा कोंडीबा आठवले , ओंकार विलास सितप , नाजुका समीर आहिरे , मुकुंद यशवंत कांबळे , मीनाक्षी पांडुरंग डाग शंकर आत्माराम निर्मळ , कल्पना गुंडाजी कांबळे , आकाश ठकराल शेजवळ , प्राजक्ता संतराम वैरागे या दिव्यांग मुलां-मुलींचा विवाह संपन्न झाला.

Google Ad

या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना , उन्नती सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “विवाह जमवणे आणि तो यथासांग पार पाडणे ही बाब आजकाल मुला-मुलींच्या आई-वडिलांसाठी एक जिकरीचा विषय हल्ली बनला आहे . त्यात मुलगा-मुलगी जर दिव्यांग असेल तर , अश्या मुला-मुलींच्या आई-वडिलांसाठी ते एकप्रकारे धर्मसंकट च बनत आहे . अश्या वेळेस , झुंज दिव्यांग संस्थेच्या सहकार्याने आम्ही ५ दिव्यांग वधू-वरांचे सामुदायिक विवाह सोहळे मोठ्या दिमाखात पार पाडत आहोत. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सोबत समाजातील इतर दानशूर व्यक्तींचे हात देखील या पवित्र कार्यात लाभले आहेत , त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. भविष्यात उन्नती सोशल फाऊंडेशन दिव्यांग वधूवरांचे शुभविवाह दरवर्षी पार पाडेल असा या निमित्ताने आपणा सर्वांना शब्द देते.”

या अनोख्या विवाह सोहळ्याला शुभेच्छा देताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले , ” सामुदायिक विवाह सोहळा हा नेहमीच कौतुकाचा विषय आहे. मात्र , उन्नती सोशल फाउंडेशने त्यातही वैविध्य दाखवताना दिव्यांग वधू-वरांसाठी जो सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे तो निश्चितच येणाऱ्या काळात सर्वांसाठी दिशादर्शक आहे. ”

आमदार आश्विनी ताई जगताप म्हणाल्या , “गेल्या ७ वर्षांपासून उन्नती सोशल फाऊंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवून पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत अग्रक्रमाने कार्यरत आहे. आजचा हा दिव्यांग वधू-वरांचा संपन्न होत असलेला सामुदायिक विवाह सोहळा हा निश्चितच या सर्व कार्याचा कळस म्हणावा लागेल. मी श्री.संजय भिसे , उन्नतीच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे आणि झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे यांचे मनापासून अभिनंदन करते”

याप्रसंगी , पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप , विजूशेठ जगताप , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे , झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे , पि के स्कुल चे संस्थापक जगन्नाथ काटे शिवसेना गटनेते बाळासाहेब वाल्हेकर , नगरसेवक कैलास थोपटे , जयनाथ काटे , भानुदास काटे पाटील , बाळासाहेब काटे , प्रकाश झिंजुर्डे , मल्हारी कुटे , आंतरराष्ट्रीय कब्बडी पंच दत्ता झिंजुर्डे , ऍड.अशोक भाऊ काटे , विजय भिसे , विशाल काटे , संदीप काटे , विकास काटे , शेखर काटे , गुलाब मेटे , सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे , ह.भ.प.सुरेश कुंजीर , ह.भ.प.संपत मेटे , धारूमामा बालवाडकर , ह.भ.प.ऋषिकेश महाराज चोरघे यांच्या सह पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ , सर्व रहिवासी सोसायटी मधील चेअरमन आणि सदस्य तसेच , विविध क्षेत्रातील सन्मानीय मान्यवर उपस्थित होते.
सर्वच उपस्थित मान्यवरांनी नियोजित वधू-वरांना शुभेच्छा देतानाच उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

लग्न समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. तुळशीदास घोलप यांनी केले . तर , हा विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी , उन्नती सोशल फाऊंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्थेच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!