Categories: Editor Choice

सांगवीच्या बाबूरावजी घोलप विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ जानेवारी) : सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण मापारी, उपमुख्याध्यापिका संजना आवारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मनीषा वळसे याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. गेली दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा, यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षीचा पहिलाच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली.

प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर सुंदर असे कलाविष्कार नृत्य सादर केले. आय लव्ह माय इंडिया, पशु पक्षांचे गाणे, देशभक्ती गीतावर फिर भी दिलं है हिंदुस्थानी, बळीराजावर आधारित शेतकरी गाण्यावर नृत्य, लावण्या, लेझीम थीम, वो कृष्णा है अशा एका हुन एक सरस बहारदार गाण्यांवर नृत्यांचा आविष्कार सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थितांनी उभे राहून नृत्य सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली.

कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षिका माधुरी शेलार, अर्चना धुमाळ, रेखा गायकवाड, सारिका शिंदे, शीतल चव्हाण, अलका जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शेळके आणि श्रीमती भारती भागवत यांनी केले. तर मनीषा वळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील कर्मचारी, मावशी आदी शिक्षक शिक्षकेतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक शरद शेळके यांनी स्वतः मुलींना लावण्यांच्या गाण्यावर सराव करून घेतला होता. ती लावणी विद्यार्थिनींनी नृत्या द्वारे वाखाणण्याजोगी सादर केली. यावेळी सर्वांच्या आग्रहास्तव स्वतः शिक्षक शरद शेळके यांनी विद्यार्थिनींसोबत पुन्हा एकदा नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या नृत्याविष्कार पाहून दाद दिली.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असतात. असा वर्षातून एकदा प्लॅट फॉर्म उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळे पुढच्या पिढीला ते शिकण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना वाव मिळतो. यामध्ये विद्यार्थी भविष्यात आपली एखादी ओळख निर्माण करून एखादी उंची गाठण्यासाठी नक्कीच मदत मिळते.
बाळकृष्ण मापारी, मुख्याध्यापक

Maharashtra14 News

Recent Posts

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

3 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

6 days ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

6 days ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

1 week ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

1 week ago

शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…

3 weeks ago