Categories: Uncategorized

दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे व त्याच्या साथीदारास ०३ पिस्टल व ०३ जिवंत काडतुसासह अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अग्निशस्त्राचा वापर करुन गंभीर गुन्हें घडत असल्याने, त्यास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने, मा. पोलीस आयुक्त यांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना पोलीस अंमलदार आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना मिळालेल्या बातमीवरून, रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आले आहे.

आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे वय ३८ वर्षे रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे व त्याचा साथीदार  अभिजीत अशोक घेवारे वय ३५ वर्षे रा.भाग्यश्री शर्मा याचे खोलीत, हाऊस नं. १०५७/०२, विजयनगर, अल्फान्सा स्कुल समोर, काळेवाडी, पुणे यांना एस. के. वॉशिंग सेंटर समोर, मुंजोबा वसाहत, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन किं.रु. १,२०,६००/-रु. चे ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे ( राऊंड) जप्त करण्यात आले.

 त्याचे विरुध्द चिंचवड पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अटक आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago