Categories: Uncategorized

पिंगळे गुरव, येथील निळू फुले नाट्यगृहात सावरकर प्रेमींच्या उपस्थितीत शब्द,संगीत,काव्यातून उलघडले सावरकरांचे जीवनदर्शन…!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंती निमित्त राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग, संस्कार भारती व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २८ मे या कालावधीत ‌स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह आयोजित आला आहे. याच सप्ताहातील एक कार्यक्रम गुरुवार दि. २५ मे २०२३ निळू फुले नाट्य मंदिर, पिंपळे गुरव येथे पार पडला.

ज्येष्ठ बासरीवादक पं. केशवजी गिंडे, शास्त्रीय गायक पं. सुधाकरजी चव्हाण, मिलिंद कांबळे, उद्योजक विजयशेठ जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच भारतमातेच्या सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिभावंत कलाकारांच्या सादरीकरणातून सावरकरांचे विचार, त्यांचा त्याग, त्यांचे जीवन आणि त्यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने ” शब्द, संगीत व काव्यातून उलगडलेले एक ओजस्वी जीवनदर्शन…!” तेजोनिधी सावरकर या कार्यक्रमात सावरकरांच्या विचारांचा विशेष उल्लेख करण्यात आला, आणि त्यावर आधारीत गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सावरकरांनी जाती धर्म कधी मानला नाही, त्यांनी सर्व समाजास चांगली वागणूक मिळाली पाहिजे हा आग्रह धरला, यावर आधारित “मला देवाचे दर्शन घेऊ द्या” सावरकरांना प्रिय असलेले गीत “सकल जगामध्ये छान, आमचा सुंदर हिंदुस्थान” तसेच “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” अशा अनेक सुरेख गीतांचे आणि नाट्यसंगीताचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अवघे सभागृह भारावून गेले, सभागृहातील सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. देशभक्तीने परिपूर्ण अशा काही काव्यरचना, सावरकरांच्या काही अजरामर कविता, संवाद आणि स्वगतं यांच्या माध्यमातून केलेले सांगितिक अभिवाचन मनाचा ठाव घेऊन गेले.

आज पिंगळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना- मिलिंद कांबळे, निवेदन- रविंद्र खरे गायक आनंद तेलंग, अभयसिंह वाघचौरे, मिलिंद कांबळे, मिता वैद्य कानडे, स्वराली लेले, मधुरा तेलंग, शाहीर जालिंदर शिंदे साथसंगत हार्मोनियम- सोमनाथ जायदे, तबला-केदार तळणीकर, सिथेसायझर ओंकार पाटणकर, तालवाद्य- उद्धव कुंभार, बासरी – सिद्धांत कांबळे, नृत्य-मेघा कुलकर्णी व सहकारी यांनी केली. तसेच चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, भाजप निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचे मोठे सहकार्य या कार्यक्रमास लाभले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सावरकर प्रेमी नागरिक तसेच माजी नगरसेवक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago