Google Ad
Uncategorized

आंबेगाव च्या ‘एस जे टायगर’ ने जिंकला “लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ 2024” चषक रात्री 2 वाजताही दर्दी क्रेकेटप्रेमींनी पी डब्लू डी मैदानावर केली गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. नियोजनबद्ध अशा भव्य डे-नाईट क्रिकेट सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते, मनीष कुलकर्णी, निलेश जगताप, प्रवीण वाघमोडे यांनी केले होते.

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप डे-नाईट क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात गुरुवारी रात्री 11 वाजता सुकाई प्रतिष्ठान औंध विरुद्ध एस जे टायगर, आंबेगाव
यांच्यात फायनल चा सामना खेळण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण अटीतटीच्या सामन्यात ‘एस जे टायगर’, आंबेगाव संघाने जोरदार फलंदाजी करत विजयाची बाजी मारली. यावेळी अनेक क्रेकेट प्रेमींनी लाखो रुपयांची रोख पारितोषिके खेळाडूंना दिल्याचे दिसून येत होते.

Google Ad

‘एस जे टायगर’, आंबेगाव संघाने 57 एवढी मोठी धावसंख्या उभारली. त्याचा पाठलाग सुकाई प्रतिष्ठान औंध संघाने केला परंतु त्यांना ती धावसंख्या गाठण्यात अपयश आले, आणि “एस जे टायगर, आंबेगाव” विजयश्री आपल्या बाजूने खेचत तबबल एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि “लोकनेते आमदारलक्ष्मण भाऊ 2024” करंडक जिंकत त्यावर आपली मोहर उमटवली. यावेळी क्रिकेटप्रेमींनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले, अन फटाक्यांच्या अतिषबाजीने मैदान आणि परिसर उजळून निघाल्याचे दिसून येत होते.

तर “सुकाई प्रतिष्ठान औंध” हा संघ उपविजेता ठरला. त्यांना भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले, यावेळी रात्री 2 वाजताही क्रिकेटप्रेमी नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी सुसज्ज सुविधापूर्ण अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, या सामन्याबद्द्ल क्रिकेट खेळाडू व प्रेक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!