Google Ad
Uncategorized

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार ‘या’ तारखेला घेणार एकदिवसीय अधिवेशन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ फेब्रुवारी) : राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Google Ad

मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार, अन्नपाणी काही घेणारच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त आलं होतं. त्यासोबतच त्यांचं पोटंही दुखू लागलं होतं. धाराशिव, परळी, हिंगोली, नगर,बारामती, लातूर, आळंदी आणि बीड, मनमाडसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी कडकडीत बंद ठेवत सरकारलाच अल्टिमेटम दिले होते. लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा दिला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!