आमचा लढा सुरूच राहणार आहे सत्तर वर्ष मराठा समाजाला मूर्ख बनविण्याचे काम सरकारने केले. आम्ही षडयंत्रला घाबरत नाहीत. आमच्या मराठा लेकरांसाठी हा लढा शेवटपर्यंत घेवुन जावू. ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायचीच कोणीही आडवा आला तरी त्याला आडवा करू, आत्ता जगायचे ते फक्त मराठ्यांच्या लेकरांसाठीच्या न्याय हक्कासाठीच.
मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जात असताना पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सांगवी फाटा येथून संपूर्ण रस्त्यावर पदयात्रेतील मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी सेवा व्यवस्था करण्यात आली.
बुधवार ता.२४ सकाळी ९ वाजल्या पासून जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, नवी सांगवी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पदयात्रेच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. रात्री दहाच्या सुमारास औंध राजीव गांधी पुलावरून पदयात्रेचे पिंपरी चिंचवड शहर हद्दीत आगमन झाले. त्यावेळी लोकनेते ‘लक्ष्मण जगताप’ व ‘शंकरभाऊ जगताप’ मित्रपरिवाराच्या वतीने जे सी बी मधून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले, सकल मराठा समाज परिवार दिवसभर स्वागताची वाट पहात होता, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सांगवी फाटा, रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा चौकांमधून स्वागत कमानी, कॉर्नर स्टेज उभारण्यात आले होते.
सांगवी फाटा ते रक्षक चौक जगताप डेअरी मार्गावर अल्पोहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खिचडी, केळी वाटपासाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. चलो मुंबई , एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिस विभागाकडून रहदारीसाठी चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला.
ढोलवाद्यांच्या गजरात स्वागत करण्यासाठी परिसरातील विविध ढोलताशा पथकांना पाचारण करण्यात आले होते. पदयात्रेतील पाच हजार बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था सांगवी फाटा दरम्यान मार्गावर पाचशे डझन केळी,नाष्टा,पाणी बाटली, बाॅक्स , साधारण एक हजार भगव्याटोप्या, ताफ्यातील बैलगाडीच्या बैलांसाठीही खुराक इ. व्यवस्था मार्गावर करण्यात आली होती.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…