Google Ad
Uncategorized

अबकी बार ४०० पार…! भाजपचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप, यांचीही उपस्थिती !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ फेब्रुवारी) : लोकसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन (BJP National Council 2024) आजपासून (दि. १७) नवी दिल्ली येथे सुरू झाले आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब्, राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा जी , गृहमंत्री मा.अमितजी शाह, संरक्षण मंत्री मा.राजनाथ सिंहजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विचारमंथन आणि आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून (१७ फेब्रुवारी २०२४) सुरू होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या या सर्वसाधारण सभेत लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार होणार असून यावेळी दोन प्रस्ताव आणले जाऊ शकतात. पहिला – विकसित भारत तसेच मोदींच्या हमीवर असू शकतो, तर दुसरा राम मंदिराशी संबंधित असल्याचे मानले जाते.

Google Ad

नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होत असलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रदेश उपाध्यक्ष श्री.राजेशजी पांडे, भाजपा शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप, सरचिटणीस श्री. विलासजी मडिगेरी, श्री. नामदेवजी ढाके, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री. अनुपजी मोरे अध्यक्ष दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश भाजपा श्री.राजेशजी पिल्ले आदी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!