Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ फेब्रुवारी) : नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम आणि जूनियर कॉलेज मध्ये १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली .यावेळी सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे श्री. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे आगमन व त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवजयंतीचा औचित्य साधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित जीवनपट सादर केले तसेच शिवचरित्र, शिवगीत, नृत्य, पोवाडा, शिवगर्जना, मनोगत इत्यादी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले .

Google Ad

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. १.मुलांनी ग्रंथालयाचा उपयोग केला पाहिजे, सायन्स लॅब चा वापर केला पाहिजे. २. मुलांना किल्ले,गड चढायला उतरवायला शिवरायांनी कसे धडे दिले गेले हे सांगितले.३. आई-वडिलांनी मुलांना चांगले विचार द्या मुलांचा आहार कसा असावा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्य सादरीकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोवडाच्या स्वरूपात सादर करण्यात आले, या सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ,त्यांचे कार्य, त्यांचे मंत्रिमंडळ व मंत्रिमंडळावर असलेल्या त्यांचा वचक या सर्व कार्याची ओळख यानिमित्ताने करण्यात आली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विजू अण्णा जगताप, सचिव श्री. शंकर शेठ जगताप यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्था सदस्य डॉक्टर विकास पवार सर, श्री प्रताप बामणे सर, सौ.स्वाती पवार, पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभाग, माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका विभाग मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर ,श्री. देवराम पिंजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!