Categories: Uncategorized

भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत – खासदार श्रीरंग बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ फेब्रुवारी) :  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. १५) वाकड भागात नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे हे सुद्धा प्रचारात मैदानात उतरले आहेत. चिंचवडमधील जनता सुज्ञ आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विकासाला ते मत देतील आणि अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी उपममहापौर झामाबाई बारणे, नानी घुले, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश बारणे, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, सुरेश राक्षे यांच्यासह भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने राज्याच्या गाडा हाकत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या मजबूत सरकारला आपलीही तेवढीच साथ मिळायला हवी. चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मतदान करावे. अश्विनी जगताप यांना मत म्हणजे लक्ष्मण जगताप यांना मत असणार आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्याची हीच खरी वेळ आहे. जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.”

अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “माझ्या पतीची आज जयंती होती. त्यांच्या आठवणी कधीच माझ्या मनातून जाणार नाहीत. आज जयंती असूनही ते दुःख बाजूला सारून प्रचारात उतरले आहे. चिंचवड मतदारसंघातील जनतेने अखंडपणे ४० वर्षे माझ्या पतीवर भरभरून प्रेम केले. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि भाजपाच्या कमळ चिन्हावर मतदान करून मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.”

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago