Google Ad
Uncategorized

Pune : पुण्यातील गणेश मंडळांनी केली मागणी … मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. मात्र, आता पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे .पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत गुरुवारी (१३ऑगस्ट) बैठक झाली. यात ही सामूहिक मागणी करण्यात आली.

“गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी तो मंदिरात करणं शक्य नाही. मंदिरांमध्ये एक मूर्ती असताना आणखी एका मूर्तीची प्रतिष्ठापना करणे योग्य नाही. सजावट केली जाणार नाही. अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील. उत्सव मंदिरात केला, तर बंदिस्त जागेत गर्दी होण्याचा धोका आहे. उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे, अशी भूमिका या बैठकीत गणेश मंडळांनी मांडली.

Google Ad

दरम्यान, यावर्षी पदपथांवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्तीच्या विक्री करीता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. या सर्व गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात येणार आहेत.

तसेच मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी या फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवाय मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाचं प्राधान्य द्यावे, असंही आवाहन मोहोळ यांनी केलंय. दरम्यान यापूर्वीच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन मोहोळ यांनी केलं होतं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!