Google Ad
Uncategorized

सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज’ विद्यालयाचा १० वी बोर्ड परीक्षेत सलग आठ वर्ष १००% यशाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी मिळवले दणदणीत यश

“उत्तुंग यशाची परंपरा”

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सातत्याने आठ वर्ष १००% यशाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळवले.बारावी सोबतच दहावीचा पण शाळेचा १००% निकाल लागला असून यात

१) रिया घोंगडी ९६:८०%(प्रथम)
२) तेजस पिंपळे ९३:२०%(द्वितीय) तर
३) रिद्धी पारधी ९२:६०%(तृतीय)

Google Ad

क्रमांक मिळवून यशाचे मानकरी ठरले.

यांच्या यशा मध्ये संस्थेचे सचिव मा.शंकर शेठ जगताप उपाध्यक्ष विजू अण्णा जगताप, सदस्य डॉ.विकास पवार , प्रा. प्रताप बामणे, स्वाती पवार मॅडम, देवराम पिंजन स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या इनायत मुजावर मॅडम,सर्व शिक्षक वृंद यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या या यशाबद्दल सचिव, उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ, आणि शाळेच्या प्राचार्या इनायत मुजावर मॅडम यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!