Google Ad
Uncategorized

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन १८ ते १९ टक्क्यांवर आला आहे, ज्यामुळे शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे . ही पाणीकपात २० जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग 31 नवी सांगवी आणि 29 पिंपळे गुरव मधील नागरिकांना या अपुऱ्या आणि अवेळी येणाऱ्या पाणी पुरवठ्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी स्थानिक नगरसेवक आणि आमदार शंकर जगताप यांना आपली समस्या सांगितली, त्यांनी तात्काळ दखल घेत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

Google Ad

पाणी पुरवठा वेळेत होणार बदल …

प्रभाग 31 नवी सांगवी भागात तसेच प्रभाग 29 पिंपळे गुरव भागात पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा याकरिता अधिकाऱ्यांनी नवीन वेळापत्रक तयार केले आहे , त्याप्रमाणे सर्वाना सुरळीत पाणी पुरवठा होईल असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले…

▶️असे असेल वेळापत्रक ..

पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून वेळापत्रकात महत्त्वाचा बदल : पिंपळे गुरव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे (PCMC) पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून पुरवठा कालावधी कमी करण्यात आला आहे.️
महत्त्वाचे :शुक्रवार (२६/०६/२०२६): पाणीपुरवठा नियमित वेळेत सुरू राहील.
शनिवार (२७/०६/२०२६): दापोडी भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
रविवार (२८/०६/२०२६): खालील नवीन वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा लागू होईल.
पाणीपुरवठा एक दिवसाआड (alternate days) राहील.
नवीन पाणीपुरवठा वेळापत्रक (रविवारपासून लागू)

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!