Google Ad
Editor Choice

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या विशेष उपाययोजना; निष्काळजीपणा करणाऱ्यांवर केली जाणार शिस्तभंगाची कारवाई…

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,दि.२३ ऑक्टोबर २०२६ :-* पाणी बचत करण्यासोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक आयुक्तांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.

पाणी बचत व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी संबंधित विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावी. तसेच, या कामात दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी व आंद्रा धरणातून १.२९ टीएमसी असे एकूण ९.९९ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. शहराची अंदाजित लोकसंख्या ३८ लाख असून, शहरात दररोज सुमारे ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध होत असून, सध्या वितरण व्यवस्थेनुसार शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पवना धरणामध्ये १४ ऑक्टोबर २०२६ अखेर ९७.१७ टक्के, तर आंद्रा धरणामध्ये ९५.८० टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर २०२६ मध्ये परतीचा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा व मागील वर्षाचा अनुभव विचारात घेऊन पाणी बचतीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यामध्ये महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई तसेच महापालिकेच्या इतर इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची तपासणी करावी. पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे निर्देश स्थापत्य व पाणीपुरवठा विभागांना देण्यात आले आहेत.

तर शिक्षण विभागाने शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सार्वजनिक स्वच्छतागृहांसह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर ठिकाणी गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्रीडा विभागाने मैदानांवर पाणी फवारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून आवश्यकतेनुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर संबंधित विभागाशी समन्वय साधून करावा आणि उद्यान विभागाने देखील झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
….
पाणी गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण महापालिकेच्या सर्व इमारतींमधील पाणीगळतीची नियमित तपासणी करणे, आढळलेली गळती संबंधित विभागास तात्काळ कळवून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे आणि दुरुस्तीनंतरही गळती होणार नाही, यासाठी सातत्याने देखरेख ठेवणे, अशा सूचनाही सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, पाणीपुरवठा विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने भौगोलिक स्थानाच्या आधारे (जीपीएस) पाणीगळतीच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करून दुरुस्तीनंतर पुन्हा गळती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पाण्याचा अपव्यय रोखण्यामध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्लंबरचा सत्कार करण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

पाणी बचतीसाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळा, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि अन्य महापालिका आस्थापनांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून पाणी बचतीच्या उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

• डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!