Google Ad
Uncategorized

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध*

*पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू*

Google Ad

*पाणी जपून वापरा; महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन*

महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. १९ जून २०२६ :* पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा १९ टक्के शिल्लक राहिल्याने आणि यंदाच्या मान्सूनला झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना पुणे पाटबंधारे विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शहराच्या पाणी पुरवठ्यात आज शुक्रवार, १९ जून २०२६ पासून १५ टक्के कपात करण्यात येत असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे आगामी कालावधीतील पाण्याची उपलब्धता आणि वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आली असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले आहे.

उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे यांसारख्या बाबी टाळून पाणी बचतीत सक्रिय सहभाग नोंदवावा. पाण्याची बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, पाणी बचतीचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे.
— *डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!