Google Ad
Uncategorized

Delhi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत करण्यासाठी आरएसएसचे प्रमुख ‘मोहन भागवत’ यांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३जुलै) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत करण्यासाठी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. अशातच मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा उघडणार असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला.
देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघाशी मुस्लिमांना जोडण्यात येणार आहे.

त्याशिवाय संघाने सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय संघाने आयटी सेल उघडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. आरएसएसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रांत प्रचारकांना त्यांच्या कामाचे स्वरुप समजावून सांगण्याबरोबरच पुढील वर्षभरामध्ये संघाकडून काय काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत, याची कल्पना सध्या तरी देण्यात आली आहे. तसेच संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे.

Google Ad

दरम्यान, क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचं मुख्यालय चंदीगडमध्ये असेल. त्याशिवाय भैयाजी जोशी यांच्याकडे संघाकडून विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना विहिंपचे संपर्क अधिकारी करण्यात आलं आहे. डॉक्टर कृष्णा गोपाल यांना विद्या भारतीचे संपर्क अधिकारी करण्यात आले आहे. तर सरकार्यवाहक अरुण कुमार हे संघ आणि भाजप दरम्यान समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

129 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!