Categories: Editor Choice

सांगवी च्या पी डब्लू डी मैदानावर दसऱ्याला होणार ५१ फुटी रावणाचे दहन, जय्यत तयारी सुरू … महिलांच्या करीताही ‘महाभोंडला’ …. येथे करा नावनोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.६ ऑक्टोबर) : नवरात्र म्हटले की देवीची पूजा, गरबा आणि दांडीयांची धमाल यासोबतच आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे भोंडला किंवा हादगा. खेडेगावांमध्ये आवर्जून खेळला जाणारा हा खेळ शहराच्या फ्लॅटसंस्कृतीतही उत्साहाने खेळला जातो. महिलांच्या बालपणातील स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) दिवशी सांगवी येथील पी डब्लू डी मैदानावर महाभोंडल्याचे आणि ५१ रावणाचे ‘रावणदहन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रावणाचा हा विशेष पुतळा तयार करण्यासाठी कारागीर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

सांगवी च्या पी डब्लू डी मैदानात रावण दहन कार्यक्रमाची तयारी जोरदार तयारी सुरू असल्याचे पहायला मिळाले, ती पाहण्यासाठी मैदानावर दिवसभर बालचमुची गर्दी पहायला मिळते. या अगोदर झालेल्या रावण दहन कार्यक्रमाच्या गर्दीचा उच्यांक यावेळी मोडला जाणार असे तयारी वरून दिसून येते.

समाजामध्ये रावणाला एक दुर्गुणी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. म्हणूनच त्याचे दर वर्षी दहन केले जाते. असं म्हणतात की, रावण हा खूप चांगला राजा होता. याचबरोबर राजकारण करण्याचे कौशल्य त्याच्यामध्ये होते.

नवरात्र खऱ्या अर्थाने महिलांचा सण व उत्सव. देवीची पूजा जशी असते, तसेच मुली व महिलांना या नऊ दिवसांत गरबा, दांडिया यात नाचता येते. विविध रंगांच्या साड्या नेसण्याची संधी असते आणि डिझायनर, पारंपरिक मिश्रणाचे कपडे घालता येतात. नवरात्रीच्या काळात म्हणजे हस्त नक्षत्रापासून अनेक मराठी कुटुंबांत व वसाहतीत नऊ दिवस भोंडला असतो.

भोंडला हा मुली आणि महिलांचाच खेळ प्रकार. त्या गोलाकारात वेगवेगळी गाणी म्हणत फेर धरतात व नाचतात. हत्ती ही हस्त नक्षत्राची ओळख. त्यामुळे भोंडला सुरू होण्याच्या आधी पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याची पूजा करतात.

शहरातील भगिनींना महाभोंडला मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या ग्रुप चे नाव भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कृष्णा चौक, नवी सांगवी येथील कार्यालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

4 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

2 weeks ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago