Categories: Uncategorized

बारामतीत भाजपने राष्ट्रवादीविरुध्द दंड थोपटले … अजितदादांनी बारामतीत उतरवला तगडा उमेदवार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ नोव्हेंबर : नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी बारामतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुरस्कृत आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिहेरी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी व भाजप बारामतीत एकमेकांविरोधात नगरपरिषदेत लढणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. १७) सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी शेवटच्या क्षणी गर्दी केल्याने बारामती नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. तीन वाजता दरवाजे बंद करुन आतमध्ये असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरुन घेण्यात आले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजप पुरस्कृत आघाडीकडून गोविंद देवकाते यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे नाव एक-दोन दिवसात जाहीर केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बहुजन समाज पक्षाकडून काळूराम चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मित्रपक्षांसह निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

भाजपचे अविनाश मोटे व गोविंद देवकाते यांनीही भाजप तीस जागांवर, राष्ट्रीय समाज पक्ष चार जागांवर तर इतर ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देत पूर्ण 41 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली. भाजपने अत्यंत गोपनीय पध्दतीने मोट बांधून शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करत महायुती असली तरी बारामतीत राष्ट्रवादीविरुध्द दंड थोपटले आहेत.

बारामतीत शेवटच्या क्षणापर्यंत नावे गोपनीय ठेवत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी व भाजपकडून केला गेला. अनेक इच्छुकांना अगदी शेवटच्या क्षणी फोन आले व त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेकांची यात मोठी धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही राष्ट्रवादीत युती होणार अशी चर्चा होत होती, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

4 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

5 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

2 weeks ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago