राष्ट्र विरोधी कारवाया रोखण्यासाठी युवकांनी एकत्रित येणे गरजेचे … आमदार महेश लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १२जानेवारी ) : स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा भोसरी चऱ्होली मंडल यांच्या वतीने पदनियुक्ती व युवा पुरस्काराचा वितरण सोहळा दिघी येथील राघव मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला.

त्यावेळी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आमदार श्री महेश दादा लांडगे,दत्तात्रय आबा गायकवाड तसेच नगरसेविका निर्मला ताई गायकवाड, हिराबाई नानी घुले, नगरसेवक राजेंद्र लांडगे, उत्तम केंदळे,विकास डोळस तसेच भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेतजी चोंधे आणि सरचिटणीस नरसेवक दिनेशजी यादव उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत मंडलाध्यक्ष श्री उदय गायकवाड यांनी केले तर संकेतजी चोंधे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२१ हा सौ सुवर्णा सुखदेव वानखेडे याना प्रदान करण्यात आला.आणि युवा पुरस्कार २०२१ हा विराज लांडगे,जय वाळके,प्रदीप सणस या राष्ट्रीय खेळाडू आणि महादेव काकडे आणि यशवंत मगदूम याना प्रदान करण्यात आला.

संघटन करण्यासाठी व राष्ट्रोन्नतीसाठी युवा शक्तीचं योगदान फार महत्वाचे आहे असे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री दत्तात्रय आबा गायकवाड यांनी केले.त्याचप्रमाणे युवांचे प्रेरणास्थान आमदार महेश दादा लांडगे यांनी मार्गदर्शन केले. नंतर या कार्यक्रमाची सांगता श्री शिवराज सुदाम लांडगे यांनी आभार व्यक्त करून केली.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago