पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार ,१२ जानेवारी २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १२, जानेवारी २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ११९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २२० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – चिंचवड ( ६२ वर्षे , ८८ वर्षे ) , पिंपरी ( ५७ वर्षे ) ०१ स्त्री- भोसरी ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – जुन्नर ( ४८ वर्षे ) , सातारा ( ५६ वर्षे ) ०२ स्त्री- पुणे ( ६० वर्षे ) , शेल पिंपळगाव ( ८० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

टिप -पिंपरी चिंचवड हद्दीमधील मागील २४ तासात कोवीड – १ ९ आजाराने मृत झालेले रुग्ण संख्या ०१ एवढी आहे . तसेच यापुर्वी झालेल्या ०३ मृत्युंची माहिती आज पिं . चिं . मनपा / पिं . चिं . मनपा बाहेरील वेगवेगळया रुग्णालयांकडुन प्राप्त झाल्यामुळे अपडेट केली आहे .

 

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे . त्यापैकी ७ प्रवाशांचे नमुने NIV पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता ०३ अहवाल UK स्ट्रेन B.१.१.७ करीता सकारात्मक आले होते . त्यांचे १४ दिवसानंतर २४ तासांचे अंतराने घेतलेले स्वॉब नकारात्मक आढळून आलेले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे . तसेच ०१ अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांचा १४ दिवसानंतर २४ तासाचे अंतराने घेतलेले स्वॉब नकारात्मक आढळुन आलेले असल्याने त्याला घरी सोडण्यात आलेले आहे .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

2 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

3 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

4 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

6 days ago