Categories: Uncategorized

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या १०० मीटर परिसरात ४ जून रोजी रात्री ००.०१ ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडियम, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगाव पार्क तर शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी स्टेट वेअरहाऊस, गोदाम क्र., ब्लॉक पी-३९, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव (कारेगांव) येथे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि १०० मीटर परिसरात सदर वेळेत भ्रमणध्वनी, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे व वापरण्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ आणि भारतीय दंड विधान कायद्यातील कलम १८८ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड मधील यशस्वी उद्योजक श्री.बबनराव येडे आबांना अमृत महोत्सवी वर्षाच्या दिल्या शुभेच्छा…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील  पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव…

4 hours ago

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे नवी सांगवीत जेष्ठ नागरिक अरुण चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : विज्ञान युगाच्या चर्चा करत असताना भौतिक सुखासाठी होणारी प्रचंड…

4 hours ago

सांगवीच्या मृत्युंजय शाळेत विद्यार्थांचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) : राज्यातील शाळा आजपासून गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत तसेच…

2 days ago

पावसाळापूर्व कामांसाठी मनपा अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’; नवी सांगवीत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी घेतला समस्याचा आढावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा…

5 days ago

पुण्यातील ऐश्वर्य कट्ट्यावर जाग्या झाल्या दादा कोंडके-निळू फुलेंच्या आठवणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जून) : एरवी गप्पांमध्ये रंगून जाणाऱ्या ऐश्वर्य कट्ट्यावर आज दादा कोंडके…

6 days ago

वाकडमधील नवीन शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ११ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथे माध्यमिक विद्यालयासाठी नव्याने इमारत…

6 days ago